{BCN} रावेरात रूपम मॉलमध्ये आढळले १२१ ग्राहक, शटरला मात्र कुलूप. मॉल सील, १ लाख ४३ हजारांचा दंड.

{BCN} रावेरात रूपम मॉलमध्ये आढळले १२१ ग्राहक, शटरला मात्र कुलूप. मॉल सील, १ लाख ४३ हजारांचा दंड.

रावेर :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहे. अत्यावश्यक गरजा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे. मात्र, शहरातील रुपम मॉल या कापड दुकानदाराने शासनाचे नियम धाब्यावर बसवल्याचे मंगळवारी समोर आले. पथकाने कारवाई केली तेव्हा या दुकानात तब्बल १४३ जणांची उपस्थिती होती. त्यामुळे तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या उपस्थितीत दुकान सील करण्यात आले. तसेच कोरोना नियमांचे व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे १ लाख ४३ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. ही तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनाने मंगळवारी शहरात कारवाई सुरू केली. त्यात शहरातील रुपम कापड मॉलमध्ये अनेक ग्राहक असल्याचा संशय आला. रुपम मॉलने नियमांचे उल्लंघन केले आहे. या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. रवींद्र लांडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, रावेर आठ दुकानांवर कारवाई परवानगी नसताना दुकाने उघडी ठेवत शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मंगळवारी अमर परिधान, अमर स्टोअर्स, न्यू बाबा मोबाईल शॉपी, एमबी फूट वेअर, साई बूट हाऊस या पाच दुकानांवर कारवाई झाली. त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड करण्यात आला. यापूर्वी सोमवारी सत्यम ड्रेसेस, विजय गोटीवाले ज्वेलर्स, महालक्ष्मी ज्वेलर्स या तीन दुकानांना ७५०० रुपये दंड केला. दुकान मालकाची मुजोरी पालिका व पोलिसांचे पथक कारवाई करत असताना दुकान मालक सुरेश ललवाणी यांचा मुलगा विक्की ललवाणी याने अरेरावी केली. ‘मै तो करोडपती है, मुझे इस धंदे की कोई जरूरत नही’ असे तो सांगत होता. तरीही पथकाने नियमानुसार रुपम मॉल सील केला. यानंतर कारवाईचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. पुढील आदेश येईपर्यंत हा मॉल सील असेल. रावेर येथील रूपम मॉलला बाहेरून कुलूप असले तरी अात गर्दी होती.

Related Post: