{BCN CITY NEWS} नंदुरबार :- वाळू माफियांची मुजोरी ,भाजप नगरसेवकाचा महिला तलाठी वर हल्ला.

नंदुरबार मधील भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसिलदार नियुक्त वाळु तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पथकातील निशा पावरा या महिला तलाठी यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहान केली आहे. गौरव चौधरी यांच्या वाळु वाहतुक करणाऱया वाहनाकडे गुजरात मधुन महाराष्ट्रात वाळु वाहतुकीचा झिरो  स्वामीत्व पावती नव्हता. म्हणुन या तपासणी पथकाने दोन तास वाळु वाहतुक करणारा ट्रक अडवला. यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निशा पावरा सह अन्य दोन महिला तलाठी कर्मचारी यांनी तहसिलदार यांच्य वाहनातुन पाठलाग करुन ट्रक अडवला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नगरसेवक गौरव चौधरी आणि पथकातील महिला तलाठीमध्ये वाद झाला. यानंतर नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठीसोबत शिवीगाळ करत त्यांना धक्काबुकी करुन मारहान केली. यानंतर संतप्त तलाठींसह महसुलच्या सर्व अधिकारी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडुन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे नगरसेवक गौरव चौधरी यांनी या पथकावर वाळु ट्रक अडवुन पैशांची मागणी करण्याचा आरोप केला आहे. आपण कोणालाही मारझोड केली नसुन संबंधीत महिला तलाठी या पाय अडकुन खाली पडल्याचा त्यांना दावा केला आहे. त्यांच्या वाहनाच्या चालकांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली आहे.  दरम्यान या घटनेनंतर या पथकातील अन्य महिला तलाठी प्रचंड ताणतणावात असुन याप्रकरणी न्यायाची मागणी त्यांनी केली आहे.

 सचिन हिरे – (उपविभागीय पोलीस अधिकारी)

Post Author: CoinCryptoNews