{BCN} जळगाव :- ऑफिसमध्ये ओली पार्टी करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर संध्याकाळपर्यंत कारवाई करणार.

{BCN} जळगाव :- ऑफिसमध्ये ओली पार्टी करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर संध्याकाळपर्यंत कारवाई करणार.

जळगाव शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्याचे विभागीय कार्यालयाचे जळगावात नुकतेच उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. नागरिकांना नाशिक कार्यालयात जाऊन जो वेळ जात होता तो जाऊ नये म्हणून नुकतेच हे कार्यालय सुरू करण्यात आले होते. मात्र या कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांची ओली पार्टी रंगळ्याचा विडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मंडळाच्या कार्यालयात आज कर्मचाऱ्यांमध्ये दारूची पार्टीची झाल्याचा खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. यात पार्टीत दारूची बाटली, चखना आणि दारूने भरलेला ग्लास दिसून येत आहे.

या अधिकार्‍यांवरती आज संध्याकाळपर्यंत सेवा शर्ती च्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, दारू पिताना संबंधित कर्मचारी हे कार्यालयातच आहेत असे स्पष्ट दिसत आहे याचीही कबुली वरिष्ठ अधिकारी एस निकम यांनी दिलेली आहे.

Related Post: