{BCN} मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देऊन जामनेर विधानसभा क्षेत्रातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील.

{BCN} मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देऊन जामनेर विधानसभा क्षेत्रातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील.

जामनेर विधानसभा क्षेत्रातील ज्या संस्थांचे मा.जि.प.सदस्य संजयदादा गरुड प्रतिनिधित्व करतात, त्यापैकी आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था, शेंदुर्णी यांचे तर्फे रु.२ लाख ५१ हजार व शेंदुर्णी सह.फळ विक्री संस्था शेंदुर्णी तर्फे २ लाख १ हजार तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी जि.प.सदस्या सौ.सरोजिनीताई गरुड यांचे सात महिन्यांचे मानधन रु.२१ हजार असे एकूण ४ लाख ७३ हजारांचा निधी संजयदादा गरुड यांनी आज मंत्रालयात जामनेर विधानसभा क्षेत्रातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत दिली. या प्रसंगी संजय गरुड यांचे समवेत मा.पं.स.सदस्य सुधाकर बारी, पंकज जैन आदी उपस्थित होते.
“मला जामनेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी ८० ते ८३ हजार मतदारांनी मते दिलेली आहेत. त्यांचे ऋण म्हणून मी फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून मदत करीत आहे. यासाठी मतदारसंघातील नागरिकांसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालय, पहूर ग्रामिण रुग्णालय यासह तालुक्यातील व लोहारा कुऱ्हाड गटातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कुठेही लसींची कमतरता भासू देऊ नका. व या मागणीस महाविकास आघाडी सरकार मधील हजर असलेले सर्वच मंत्री महोदयांनी संमती दिलेली आहे.” असे यावेळी संजयदादा गरुड यांनी सांगितले. यामुळे जामनेर, पहूर, शेंदुर्णी, वाकोद, वाकडी, फत्तेपूर, गारखेडा, बेटावद, नेरी व पाचोरा तालुक्यातील लोहारा, कुऱ्हाड, वरखेडी येथील केंद्रांना संजयदादांच्या या उपक्रमाचा फायदा होणार आहे.
संजयदादा गरुड यांच्या या उपक्रमाचे मंत्रालयात उपस्थित मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, महसूल मंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतजी पाटील, आरोग्य मंत्री मा.ना.राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री मा.ना.हसन मुश्रीफ, सहकार मंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री मा.ना.धनंजय मुंडे आदींनी संजयदादा गरुड यांचे कौतुक केले. याच बरोबर जामनेर विधानसभा मतदार संघातील नागरिकांनीही दादांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले आहे.
यासोबतच जामनेर तालुक्यातील विविध सिचन प्रकल्पग्रस्त हलाखीचे जीवन जगत असून त्यांना एक महिन्याच्या आत मोबदला मिळावा अन्यथा त्यांची राहिलेली शेती यावर्षी पडीक राहील म्हणून जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतजी पाटील यांना निवेदन देखील दिले. तसेच २५/१५ योजनेचा निधी थेट सरकारकडून मिळत असल्याने जामनेर तालुक्यासाठी विविध सुमारे ३८ गावांमध्ये रस्ते काँक्रिटीकरण व गटारी, सभामंडप, पेव्हर ब्लॉक आदी कामांसाठी २५/१५ निधी योजने अंतर्गत सुचविलेली कामे मंजूर होऊन त्यास प्राधान्याने निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले.

Related Post: