{BCN} रमजान ईद साठी बाजार मध्ये विशेष सूट द्या – जिल्हाधिकारी यांना मुस्लिम ईदगाह ट्रस्ट चे साकडे.

{BCN} रमजान ईद साठी बाजार मध्ये विशेष सूट द्या – जिल्हाधिकारी यांना मुस्लिम ईदगाह ट्रस्ट चे साकडे.

रमजान ईद साठी बाजार मध्ये विशेष सूट द्या – जिल्हाधिकारी यांना मुस्लिम ईदगाह ट्रस्ट चे साकडे
जिल्हाधिकारी लातूर प्रमाणे शिथिलता द्या

रमजान पर्व अंतिम चरणात असून गुरुवारी किंवा शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यावर रमजान ईद साजरी होईल परंतु कडक निर्बंध असल्या कारणामुळे मुस्लिम धर्मीयांची ईद मागील दोन वर्षापासून साजरी होत नसल्याने आज जळगाव जिल्हा मुस्लिम इदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची दुपारी दोन वाजता भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
कपडा-ड्राय फ्रुट-फळ- धान्य- फेरीवाले यांना विशेष सूट द्या

११ ते १४ या तीन दिवसासाठी बाजाराच्या वेळेत विशेष सवलत देऊन त्यात प्रामुख्याने लहान मुलांचे रेडिमेट कपडे ,त्यांना लागणारी खेळणी व इतर साहित्य तसेच शीर-खुर्मा साठी लागणारे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, फितरा साठी धान्य व उपास सोडण्यासाठी आवश्यक ते फळे व भाजीपाला यांची दुकाने दुपारी दहा ते बारा किंवा संध्याकाळी चार ते सहा या वेळेत विशेष बाब म्हणून उघडण्याची परवानगी द्यावी तसेच जिल्हा दंडाधिकारी लातूर यांनी ज्याप्रमाणे आदेश पारित केले त्याच धर्तीवर शासनाच्या नियमावलीच्या अधीन राहून काही कडक नियम शितील करू परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

माननीय अभिजीत राऊत यांनी सदर प्रकरणी सकारात्मक धोरण अवलंबून काहीतरी प्रमाणात ढिल देता येईल का ते तपासून त्वरित आदेश करतो असे आश्वासन दिले आहे.

Related Post: