(BCN CITY NEWS) जाडगाव :- नॅशनल हायवे वरील अपघात पिंपळगावचे दोघे तरुण ठार.

(BCN CITY NEWS) जाडगाव :- नॅशनल हायवे वरील अपघात पिंपळगावचे दोघे तरुण ठार.

जाडगाव—नॅशनल हायवे क्रमांक 6 महामार्गावरील जाडगाव फाटया नजीक भरधाव वेगात ट्रकची मोटरसायकला धडक दिल्याने पिंपळगाव बुद्रुकचे दोघे तरुण ठार झाल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडल्याने ट्रक चालकाविरूध्द भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत पोलिस सूत्रानी दिलेली माहिती अशी की , सोपान रमेश मावळे वय १९ सचीन सुभाष मावळे वय१८ राहणार पिंपळगाव बुद्रुक तालुका भुसावळ हे दोघे तरुण मोटरसायकल क्रंमाक एम एच १४ सी टी ४७९८ वरिल चालक सचीन मावळे दीपनगर येथून घरी परत येत असतांना जाडगाव फाटया नजिक सोमोरुन येणारा ट्रक क्रंमाक एम एच १५ एफ व्ही १४१३ वरील चालक भरधाव वेगात चालवत समोरून येणाऱ्या मोटारसायकला धडक दिल्याने दोघे तरुण ठार झाले तर घटना स्थळावरून ट्रक चालक फरार झाला . सचीन हा जागे वरच ठार झाला तर सोपान हा गंभीर जखमी झाल्याने नागरीकाच्या मदतीने त्याला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आनत असतांना रस्त्यातच मृत्यू झाला .

अपघात ग्रस्ताचे (नातेवाईक)

Related Post: