{BCN CITY NEWS} भुसावळकरांनी तापी नदीच्या पुलावर गर्दी केली.

{BCN CITY NEWS} भुसावळकरांनी तापी नदीच्या पुलावर गर्दी केली.

हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतंतधार पाऊस सुरू असल्याने तापी नदी मध्ये धरणाचे पाण्याचे विसर्ग सोडण्यात येत आहे त्यामुळे तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे तापी नदीला आलेला पूर पाहण्याकरिता भुसावळकरांनी तापी नदीच्या पुलावर गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे त्याचप्रमाणे तापी नदीवर पूर पाहण्याकरिता आले असता युवकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नसल्याचे दिसून येत आहे तापी नदी वर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ सुरु असते. या ठिकाणी सेल्फी काढताना एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . तापी नदीवर न्युज लोकमत 18 चा बुम पाहताच नगरपालिका प्रशासनाने पुलावर धाव घेतली. नागरिकांना नगरपालिकेचे कर्मचारी राजु चौधरी यांनी हुडकावुन लावले.

Related Post: