{BCN CITY NEWS} जळगावात जुन्या वादातून एकाचा खून.

{BCN CITY NEWS} जळगावात जुन्या वादातून एकाचा खून.

जळगाव : शहरातील खोटेनगर परीसरातील पाण्याच्या टाकीजवळ जुन्या वादातून तरुणाचा खुन झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे खोटे नगर परीसरात खळबळ उडाली आहे. महेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या असे मयत तरुणाचे नाव आहे. खोटे नगरातील रहिवासी महेश वासुदेव पाटील ऊर्फ डेम्या यांना मागील भांडणाच्या कारणावरून एकाने धारदार शस्त्राने भोसकल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास घटना घडली. खुन झाल्यानंतर परीसरातील नागरीकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. तालूका पोलिस ठाण्याचे निरीक्षकांसह पोलिस ताफा घटनास्थळावर दाखल झाला. मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला होता.

Related Post: