{BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.

{BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.

मंजूर 25 कोटींची 24 बाय 7 ची पाणी पुरवठा योजनेच्या कामाला तात्काळ सुरुवात करा अन्यथा भाजपा करणार त्रिव आंदोलन.

वरणगाव :- नगरपरिषदेला कायम मुख्यधिकारी नेमा अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दि 7 एप्रिल रोजी प्रधान सचिव नगरविकास व विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस खा रक्षाताई खडसे आ संजय सावकारे यांना केली होती त्या मागणी नुसार नूतन कायम मुख्यधिकारी म्हणून मूळ जामनेर तालुक्यातील मात्र हल्ली नेवासा जिल्हा अहमदनगर नगरपरिषद येथून वरणगाव नगरपरिषदेच्या कायम मुख्याधिकारी पदी समीर शेख यांची नियुक्ती नगरविकास विभागाने केली आहे नूतन मुख्यधिकारी पदी समीर शेख हजर झाल्यावर भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज शालश्रीफळ फुलहार देउन सत्कार माजी नगराध्यक्ष सुनील काळे उनगराध्यक्ष शेख आखलाक कामगार नेते मिलिंद मेढे भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी भाजयुमो शहाराध्यक्ष संदीप भोई गोलू राणे हितेश चौधरी मिलिंद भैसे गजानन वंजारी कृष्णा माळी दीपक चौधरी यांच्या हस्ते करन्यात आला यावेळी भाजपा च्या वतीने नूतन मुख्यधिकाऱ्यांचा सत्कार करून वरणगाव शहरात 10 दिवसाआड पिण्याचे पाणी येत असल्याने महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास व पाण्यासाठी हाल होत आहे त्यासाठी भाजपा सरकारने 13 सप्टेंबर 2019 ला 24बाय 7 अशी 25 कोटी ची पानि पुरवठा योजना मंजूर करून दिली आहे त्या योजनेच्या कामाला सुरुवात करा अन्यथा लवकरच भाजपा च्या वतीने जनआंदोलन उभारणार आहे
तसेच वरणगाव लोककल्याण हॉस्पिटल हे नगरपरिषदेने ताब्यात घेउन कोविड सेंटर सुरू करा संपूर्ण शहरात फवारणी करण्यात येऊन धुराणी करण्यात यावी मंजूर तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिराच्या कामाला सुरुवात करा भोगावती नदीच्या कामासाठी 5,50 कोटी रुपये मंजूर आहे त्या कामाला सुद्धा सुरवात करा मकरंदनगर व जगदंबा नगर मधील प्रलंबित मंजूर गार्डनचे काम उपलब्ध निधीतून सुरू करा
ग्रंथालयात फर्निचर व पुस्तके उपलब्ध करण्यात यावी
प्रधान मंत्री आवास 45 नगरिकांनी घराचे काम पूर्ण केले आहे उर्वरित दुसरा हफ्ता प्रत्येकी दीड लाखाचा हफ्ता खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाला आहे मात्र नगरपरिषदेच्या गलथानकारभारात मुळे मजूर दीड लाख लाभर्ती त्यांना भेटत नाही ति प्रक्रिया लककर राबव्युन लवकरात लवकर केंद्राने पाठविलेले पैसे वितरित करण्यात यावे
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करावी मास्क व स्यानिटीझर नागरिकांना देण्यात यावे भूमिगत गटारीचा प्रस्ताव मंजुरी साठी पाठविला आहे त्याचा पाठपुरावा करून प्रकल्प सुरू करण्यात यावा कर्मचारी यांचा पगार नियमित व आकृतिबंध मंजुरी साठी प्रयत्न करावा असे विविध वरणगाव शहरातील समस्येचे निवेदन यावेळी नूतन मुख्यधिकारी समीर शेख यांना दिले यावेळी नूतन मुख्यधिकारी यांनी मी आपल्या समस्या निकाली काढण्याची जबाबदारी घेतो असे नूतन मुख्यधिकारी समीर शेख यावेळी म्हणाले

Related Post: