भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथील नदी , तलाव व जंगल पूर्णपणे उध्वस्त झाल्याने गावाची शेती व शेतीपूरक उद्योग नसल्याने व कोरोना प्रादुर्भावामुळे गावातील नागरीकांना रोजगार साधने नसल्याने क्रांती दिन या दिवशी रिसायकल विल्हाळे बंड येथे महाजनकोच्या दिपनगर प्रकल्पाच्या राखेमुळे गाव त्रस्त झाल्याने दि ९ रोजी सकाळी १० वाजेला आंदोलन करण्यात आले आहे .
विल्हाळे गांवाची नदी , तलाव व जंगल त्वरीत राख मुक्त करून गावाची नदी पूर्वीप्रमाणे वाहती करावी व गावात सी एस आर निधीतून कामे करून कायम स्वरुपी रोजगार उपलब्ध करून दयावा . तसेच दिपनगर महाजनकोच्या ठेकेदाराकडे कार्यरत सुरक्षा रक्षक गेल्या सहा महिन्यापासून काम बंद आहे . त्या सुरक्षा रक्षकांना भविष्य निर्वाह निधी , विमा तसेच नवीन सुरक्षा एजन्सीमध्ये विनाअट सामावुन घ्यावे . अशा विविध मागण्यासाठी दि ९ रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता . मागण्या प्रशासनाने पूर्ण न केल्यास दि १७ रोजी तीव्र आंदोलन करून प्रशासनाचे व शासनाचे प्रती निधी म्हणून त्यांची सर्व जबाबदारी राहील . आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चा समितीचे चंद्रकांत चौधरी , दिनेश सुरवाडे , आकाश कुरकुरे , गणेश पाटील , लखन पाटील संतोष जाधव , रुपेश पाटील , सचीन सुरवाडे आदी उपस्थीत होते.
Related Post:
- ? XTZ/BTC reaching support ⚠️Be ready!! Tezos Technical Analysis.
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- (BCN CITY NEWS) सोनवणे दांपत्य कोरोना विरुद्ध रस्त्यावर उतरले
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- ऐसी हॉटेल, बारमध्येही लावावे लागतील पंखे.
- {BCN CITY NEWS}राज्यात नविन नियमावली लागू….
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- प्रतीक्षा संपली, भुसावळसाठी तब्बल २५०० डोस उपलब्ध.
- {BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.
- {BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.