पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील दिव्यांग कापड दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक वादातून मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील कापड दुकानदार प्रफुल्ल मांगिलाल राका (वय ५४) यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, आपण आपल्या कुटुंबासह लोहारा येथे वास्तव्यास आहोत. आमच्या मोठ्या मुलीचा येवला येथील हितेश विजय श्रीश्रीमाळ याच्याशी विवाह झाला असून तिथे तिला त्रास होत असल्यामुळे ती लोहारा येथे आमच्या घरी राहते. ती सध्या कोरोना पॉझिटीव्ह असल्याने पाचोरा येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे.
दरम्यान, दिनांक १३ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या आसपास प्रफुल्ल राका हे आपली पत्नी व नातवंडांसह घरात असतांना दोन महिला बळजबरीने घरात शिरल्या. त्यांनी आपल्याला साड्या खरेदी करायच्या असल्याचे सांगीतले. याला राका यांनी लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याचे कारण देऊन नकार दिल्यावर त्यांना दमदाटी करण्यात आली. या महिलेने कुणाशी तरी फोनवरून वार्तालाप केला. यानंतर सहा-सात जण घरात आले. यात त्यांच्या मुलीचा पती हितेश विजय श्रीश्रीमाळ, सासरे विजय भंवरलाल श्रीश्रीमाळ, दीर विजय सुयोग श्रीश्रीमाळ यांच्यासह चार जण तोंडाला रूमाल बांधून घरात शिरले. त्यांनी प्रफुल्ल राका, त्यांची पत्नी आणि नातवंडाना मारहाण केली. तसेच त्यांनी कपाटातून पाच तोळ्यांचा चपलाहार आणि २० हजारांची रोकड हिसकावून घेतली. काही वेळात शेजारचे लोक आल्यानंतर हे सर्व जण पळून गेले असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात हितेश विजय श्रीश्रीमाळ, सासरे विजय भंवरलाल श्रीश्रीमाळ, दीर विजय सुयोग श्रीश्रीमाळ यांच्यासह चार अज्ञात पुरूष व दोन अज्ञात महिलांच्या विरूध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविरूध्द भादंवि कलम ३२७, ४२७, ४४८, १४३, १८८, २६९, ३७(१); ३७(३) व १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मा.श्री. दिगंबर थोरात हे करीत आहेत.
परंतु याप्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी पंचक्रोशीतून होत आहे. कारण लहानश्या गावात बाहेर गावाहून येऊन थेट घरात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ही उघड,उघड गुंडागर्दी आहे. असे लोहारा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
घरात हल्ला झाल्यानंतर घरातील वस्तुंची झालेली तोडफोड व घरासमोर उभे असलेले हल्लेखोर छायाचित्रात दिसत आहेत.
Related Post:
- ? XTZ/BTC reaching support ⚠️Be ready!! Tezos Technical Analysis.
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- {BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तापी नदीत बुडून एकाचा मृत्यू.
- {BCN CITY NEWS}राज्यात नविन नियमावली लागू….
- {BCN CITY NEWS} सावदा :-सावद्यात उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
- {BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.
- {BCN CITY NEWS} अमळनेर :- माझा अमळनेर ग्रुप तर्फे ग्रामीण रुग्णालयात जनरेटर भेट.