{BCN CITY NEWS} दर्यापूर ग्रामपंचायत मध्ये नियमबाह्य प्लाट विक्री बाबत तहसीलदारांनी काढली नोटीस.

{BCN CITY NEWS} दर्यापूर ग्रामपंचायत मध्ये नियमबाह्य प्लाट विक्री बाबत तहसीलदारांनी काढली नोटीस.

भुसावळ तालुक्यात असलेल्या दर्यापूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्लॉटवर ८ अ लावल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गवळी व लक्ष्मी सपकाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याबाबत तहसील दार भुसावळ यांनी नोटीस काढल्याने प्रकरण चांगलेच रंगणार आहे याबाबत सविस्तर . माहीती अशी की ग्रामसेवक व शेतमालक व काही सदस्य आदींनी त्या ठिकाणी कोणत्याही सुख सुविधा नसताना खळे प्लाट नं ११६ / २ मंजुर करून नमुना आठ मध्ये लावला व सदर चे प्लॉट मनमानी भावाने विकले जात आहे सदर प्लॉटबाबत मिटींग मधे ग्रामपंचायत सदस्यांनी प्रस्ताव मनमानी पद्धतीने मंजूर करून घेतला असून या ठरावाच्या अभिलेखात ग्रामसेवकाची सुद्धा मंजुरी नसल्याचे समजते तरी संबंधितनी या बाबत योग्य दखल घ्यावी कारण सदर प्लॉटची तलाठी कार्यालयात नोंद नसून प्लॉटी पडलेल्या ठिकाणी रस्ते , स्ट्रीट लाईट उपलब्ध नाहीत यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते ग्रामसेवक सरपंच व काही सदस्य यांनी सदर चा उपक्रम मनमानी पद्धतीने केल्याने . दोन सदस्यांनी हे प्रकरण . उघडकीस आणल्याने तहसीलदार भुसावळ यांनी शेतमालक . बाळकृष्ण . पाटील यांना नोटीस बजाविली .आहे , खुलासा व कागदपत्र न सादर केल्यास जमिन . कायदया नुसार सरकार जमा होईल असे नोटीसीत नमूद आहे.
वरणगांव फॅक्टरी जवळ वाढत नागरी वस्तीत असलेल्या ह्या जागेबाबत वाद वाढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. BCN city न्युज करिता मनोहर लोणे वरणगाव

प्रशांत गवळी (ग्रामपंचायत सदस्य दर्यापूर)

Related Post: