वरणगांव शहरातील आंबेडकर नगर मध्ये जुन्या वादाची कुरापत काढून येथील रहिवाशी असलेल्या तरुणास चौघानी धारदार चाकुने अंगावर आठ वार वरून खुन केल्याची घटना सोमवारच्या रात्री १० . ३० वाजेला घडली असून चौघा संशयीताना रात्रीच पोलीसांनी अटक केली आहे. खून झालेल्या मयत व्यक्तीचे नाव सचिन जिवराज मगरे वय २७ राहणार आंबेडकर नगर असल्याचे सिद्ध झाले आहे
शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील न्यू विष्णू सॉमील च्या समोर ही घटना घडली असुन पोलीसानी चौघ संशयीत रोहीत किशोर तायडे , अजय रविन्द्र तायडे , राहुल गजानन कदम , अक्षय संजय भैसे यांना अटक करण्यात आली आहे .
या बाबत पोलीसानी दिलेलो माहीती अशी की मागील सहा महिण्यापुर्वी याच भागातील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीच्या लहान नातीचा वाढदिवसाला धक्का लागल्याच्या कारणावरूण मयत व आरोपी मध्ये वाद झाला होता व तो मिटलाही होता मात्र सोमवार च्या रात्री सचिन हा त्याच्या मोटरसायकलवर घरी जात असतांना न्यू विष्णू सॉ मिल जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चौघे आरोपी बसलेले असतांना सचिन ला त्याच्या भावासमोरच आरोपींनी चाकु काढुन वार करणे सुरू ठेवले . या घटनेत सचिन घटनास्थळी मयत झाला आहे . घटनेचे वृत्त पोलिसांना कळताच एपीआय संदिप बोरसे यांनी नावेद अली , गणेश शेळके , राहुल येवले , योगेश पाटील , मधुकर भाल शंकर आदीचे पथक नेमुन घटनास्थळी त्वरीत पाठवीले व पथकाने रात्रीच तीन आरोपीना ताब्यात घेतले असता चौथा आरोपी मंगळवारी दुपारी हजर झाला . या प्रकरणी मयताचा भाऊ भिमराज मगरे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस स्टेशनला आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांनी भेट दिली घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे करीत आहे .
बी सी एन न्युज करीता मनोहर लोणे वरणगांव
Related Post:
- ? XTZ/BTC reaching support ⚠️Be ready!! Tezos Technical Analysis.
- Bytecoin Price Prediction How High Will BCN Price Rally in 2023? BCN Updates 2023 BCN News 2023
- {BCN CITY NEWS} भुसावळ शहरांमध्ये लाकडांचे कडक निर्बंध, पोलीस प्रशासन रस्त्यावर.
- {BCN CITY NEWS} भुसावळ :- तालुक्यातीलआयुध निर्माणी वरणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा
- {BCN CITY NEWS} वरणगाव :- नवीन मुख्यधिकारी समीर शेख यांचा भाजपा तर्फे सत्कार.
- {BCN CITY NEWS} लोहारा येथे घरात शिरून राका कुटुंबीयांना धमकी देत करण्यात आली मारहाण.
- {BCN CITY NEWS}राज्यात नविन नियमावली लागू….
- {BCN CITY NEWS} भुसावळकरांचे हाल कधी थांबणार? असाच एक अवजड ट्रक अमृतच्या खड्ड्यात फसला.
- {BCN CITY NEWS} वैद्यकीय अधीक्षकांनी सुविधांचा घेतला आढावा.
- (BCN CITY NEWS) भुसावळच्या नागरिकांना उद्यापासून कडक नियमावलीला सामोरे जावे लागणार.