{BCN CITY NEWS} फुलगाव जवळ अपघातात एक ठार महामार्गाचा चौथा बळी.

{BCN CITY NEWS} फुलगाव जवळ अपघातात एक ठार महामार्गाचा चौथा बळी.

वरणगाव बायपास जवळ फुलगाव जवळ महामार्गावर 27 वर्षीय युवकाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली याबाबत माहिती अशी की फुलगाव येथील रहिवासी फुलगाव येथील रहिवासी राकेश पांडुरंग चौधरी वय 27 आपल्या मोटर सायकल क्रमांक एम एच १९ सी ई ४३०३ हिरो होंडाने हायवे जवळ वळण घेत असताना अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली या धडकेत राकेश जागीच ठार झाला आहे .त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला होता, या घटनेने फुलगाव मधील नागरिक एकत्रित येऊन त्यांनी सुमारे तीन तास रस्ता रोको केला होता . प्रेत घटनास्थळीच होते . महामार्ग प्रशासनाने दुसरा साईड सर्विस रोड न बनवल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, यावेळी वरणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुक्ताईनगर चे पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड आदी उपस्थित होते महामार्गांच्या हलगर्जीपणामुळेच हा त्याच परिसरात चौथा बळी गेला असून प्रशासनाने त्वरित यावर उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.

Related Post: